Nepal Violence :सैनिकी गाड्यांची वर्दळ अन् सायरनचा आवाज !
Nepal border violence: नेपाळच्या सीमावर्ती भागात तीन दिवस चाललेल्या हिंसाचारानंतर आता शांतता येण्यास सुरुवात झाली आहे. सीमेवर सुरक्षा वाढवली असून भारताने नागरिकांना नेपाळला न जाण्याचा इशारा दिला आहे.
काठमांडू/महाराजगंज : गेल्या तीन दिवसांपासून नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यात सुरू असलेला हिंसाचार आता थांबला आहे. या भागात संचारबंदी असल्याने नागरिक घरातच थांबत असून सैनिकांकडून गस्त घातली जात आहे.