ग्लोबल
Nepal Bus Accident : नेपाळमध्ये पहाटे भीषण अपघात, बस नदीत कोसळून १८ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
Trishuli River Accident : अपघात बेनीघाट रोरांग ग्रामीण नगरपालिकेच्या वॉर्ड ३ मधील चरौंडी जवळ पहाटे झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेपाळमध्ये सोमवारी पहाटे भीषण बस अपघात झाला आहे. धाडिंग येथे झालेल्या १८ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी बस नदीत पडल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू आहे.

