Nepal Earthquake : तिबेटमध्ये ५० जणांचा मृत्यू, घरे जमीनदोस्त; बचावकार्य सुरू

नेपाळसह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के बसले असून नेपाळमध्ये जिवीत आणि वित्तहानी झालीय. यात आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
Nepal Earthquake : तिबेटमध्ये ५० जणांचा मृत्यू, घरे जमीनदोस्त; बचावकार्य सुरू
Updated on

नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र असलं तरी चीनच्या तिबेटमध्ये मोठी जिवीतहानी झालीय. कमीत कमी ५० जणांचा तिबेटमध्ये मृत्यू झाला आहे तर ६० जण जखमी झाल्याची माहिती समजते. तिबेट-नेपाळ सीमेवर मंगळवारी पहाटे भूकंप झाला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून जवळपास दीडशे किमी अंतरावर असलेल्या लोबुचे इथं भूकंपाचं केंद्र होतं. सकाळी साडे सहाच्या सुमारास नेपाळला ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. मोठ्या प्रमाणांवर इमारती पडल्या असून अद्याप मृतांचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com