Nepal Flood: Bhotekoshi River Flood
esakal
नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या महापुराने मोठी हानी केली आहे. चीन-तिबेट सीमेजवळील भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या प्रचंड पुरामुळे गावं, रस्ते, पूल आणि हायड्रोपॉवर प्रकल्पांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची, तर शेकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. दरम्यान, या महापुराचे काही धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.