

Nepal Flood Crisis: Massive Destruction and Rising Death Toll
esakal
Nepal Flood Crisis: Massive Destruction and Rising Death Toll : नेपाळमधील महापुरात मोठा विध्वंस आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला असतानाच आता पुन्हा एकदा महापुराच्या संकटाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नैसर्गिक आपत्तीने केलेला विध्वंस अजूनही भयावह स्वरूपात समोर येत आहे. पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेल्या मलबा आणि चिखलातून मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बचाव यंत्रणांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १००० मृतदेह सापडले असून, जवळपास चार हजार नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, नुवाकोट जिल्ह्यात बचावकार्यादरम्यान समोर आलेल्या एका घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.