
Nepal Violence: काठमांडूच्या रस्त्यांवर सध्या संचारबंदीमुळे शांतता आहे. या दरम्यान, नेपाळच्या 'जेन-झी' (Gen-Z) आंदोलकांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चार तास चाललेल्या एका व्हर्च्युअल बैठकीनंतर त्यांनी देशाचे अंतरिम नेतृत्व स्वीकारण्यासाठी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव पुढे केले आहे. नेपाळच्या सध्याच्या राजकारणासाठी हे पाऊल जितके धक्कादायक आहे, तितकेच ते आशावादीदेखील आहे.