नेपाळ सरकारनं पाणीपुरीवर घातली बंदी; जाणून घ्या काय आहे प्रकरण I Nepal Government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panipuri

नेपाळ सरकारनं पाणीपुरीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.

नेपाळ सरकारनं पाणीपुरीवर घातली बंदी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

नेपाळ सरकारनं (Nepal Government) राजधानी काठमांडूमध्ये (Kathmandu) अशा पदार्थावर बंदी घातलीय, जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. खरं तर, इथं आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) काठमांडूच्या एलएमसीमध्ये गोलगप्प्यावर बंदी घातलीय. खोऱ्यातील ललितपूर महानगरात कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पाणीपुरीमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यात कॉलराचे बॅक्टेरिया (Cholera Bacteria) आढळून आल्याचा दावा करण्यात आलाय.

महापालिका पोलिस प्रमुख सीताराम हचेतू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजबजलेल्या भागात आणि परिसरात पाणीपुरी (Panipuri) विक्रीवर बंदी घालण्यासाठी सर्व तयारी करण्यात आलीय. पाणीपुरीमुळं कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचा धोका असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. रविवारी काठमांडूमध्ये कॉलराचे सात नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळं घाटीतील एकूण रुग्णांची संख्या 12 झालीय.

हेही वाचा: महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार; दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास

नेपाळ आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत एपिडेमियोलॉजी आणि रोग नियंत्रण विभागाचे संचालक चमनलाल दास यांनी सांगितलं की, काठमांडू महानगरात कॉलराची पाच प्रकरणं आढळून आली आहेत. याशिवाय, चंद्रगिरी नगरपालिकेत एक आणि बुधानीकांता नगरपालिकेत एक प्रकरण आढळून आलंय. दरम्यान, आरोग्य मंत्रालयानं लोकांना कॉलराची लक्षणं दिसू लागताच जवळच्या रुग्णालयात संपर्क साधण्याचा सल्ला दिलाय.

Web Title: Nepal Government Bans Panipuri On Kathmandu After Rising Case Of Cholera Health Ministry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..