
20 Killed, Hundreds Injured: Nepal Government Bows to Pressure
Esakal
नेपाळमध्ये सोशल मीडिया साइट्सवर बंदी घातल्यानं जेनझी आक्रमक झाले. यानंतर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज, गोळीबाराच्या घटनेत किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे. ३०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशाचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर काठमांडूत लष्कराला उतरावं लागलं. लष्कराने संसदेच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.