
Indian bus attacked during Nepal protest violence, passengers injured and later airlifted to Delhi for treatment. ( AI Generated Image)
esakal
नेपाळमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बसवर हल्ला होऊन प्रवाशांची लूट झाली; ८ जण जखमी.
जखमी प्रवाशांना एअर अॅम्ब्युलन्सने काठमांडूहून दिल्लीला हलवले; भारतीय दूतावास सक्रीय.
भारत-नेपाळ सीमेवर सतर्क SSB जवानांनी ६० नेपाळी फरार कैद्यांना पकडले; तीन राज्यांत अलर्ट.
Indian Bus Attack in Nepal : नेपाळमधील हिंसाचार अजूनही सुरुच आहे. सरकारविरोधी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटक लुटमार करत आहेत. गुरुवारी काठमांडूजवळ काही लुटारुंनी भारतीय प्रवाशांच्या बसवर हल्ला केला आणि सामान लुटले. या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमीही झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, बसमधील बहुतेक लोक आंध्र प्रदेशचे होते. ते काठमांडूमध्ये पशुपतीनाथाचे दर्शन घेऊन भारतात परतत होते. बस मात्र उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.