
Indian tourists stopped at Nepal border amid ongoing protests and tense situation.
esakal
Tense Situation at Indo-Nepal Border :नेपाळमध्ये सध्या प्रचंड अराजकता पसरली आहे. सोशल मीडियावरील बंदीविरोधात झेन झी कडून हिंसक आंदोलन सुरू आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, पंतप्रधानांनीही राजीनामा दिला असून, सध्या ते देश सोडण्याच्या तयारीत आहेत. तर आंदोलकांनी थेट नेपाळची संसदच पेटवली आहे. एकूण तेथील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे.
हजारोंच्या संख्येत आंदोलक तरूण रस्त्यावर उतरले आहेत. जाळपोळ, दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचं प्रचंड नुकसान केलं जात आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेल आहे, तर २०० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.
नेपाळमधील ही अराजकता पाहता भारतानेही दक्षता घेतली आहे. नेपाळमध्ये जाणारी भारती वाहनं रोखली गेली आहेत, शिवाय नेपाळमधूनही भारतात येणारी वाहनं कमी झाली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सशस्त्र दलाकडून बळाचा वापर करणे सुरू आहे.
या आंदोलनाचा परिणाम कस्टम कार्यालयांवरही झाल्याचे दिसत आहे. अनेक कार्यालये बंद करण्यात आली आहेत. मालवाहू गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत. एकूणच नेपाळ आणि भारत सीमेवरील वाहतूकीसह अन्य व्यवहारांवर याचा परिणाम आता दिसत आहे. शिवाय नेपाळमधील भारतीयांसाठी हेल्पालाईन नंबरही जारी करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.