nepal violent protest pm oli resignation
esakal
सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नेपाळमधील तरुण कालपासून रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं असून आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हिंसक आंदोलनानंतर आता नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये अराजक स्थिती निर्माण झाली आहे.