
Protesters in Nepal’s capital Kathmandu set government property ablaze and stormed the President’s residence as part of the escalating Zen-G movement.
esakal
Summary
नेपाळमध्ये Zen-G आंदोलन चिघळले असून आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या निवास्थावर कब्जा करून कायदा मंत्र्याचे घर जाळले.
आतापर्यंत २० आंदोलक ठार, ९ मंत्री व उपपंतप्रधान राजीनामा देताच राजकीय संकट गडद झाले आहे.
हिंसाचार रोखण्यासाठी भारतातील बिहारमधील ७ सीमावर्ती जिल्ह्यांच्या सीमा सील करून कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.
नेपाळमधील दुसऱ्या दिवशीही तरुणांचे आंदोलन सुरुच असून काठमांडूमधील रस्यांवर जाळपोळ करत नेपाळ सरकारचे कायदा मंत्री अजय कुमार चौरसिया यांचे घरही जाळण्यात आले आहे. तर राष्ट्रपतींच्या घरावरही कब्जा करण्यात आला आहे. पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यासाठी Zen-G आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या घरावरही फायरिंग करण्यात आली नेपाळमधील राजकीय संकट अधिकच गडद होत चालले असून आतापर्यंत केपी ओली सरकारमधील ९ मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.