
Nepal Violence: 'जनरेशन-झेड' क्रांतीचा चेहरा आणि 'हामी नेपाळ' या गटाचा प्रमुख सुदन गुरुंग याने नवनिर्वाचित हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पाया पडून त्यांचा आदर केला. ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ओली सरकारविरोधातील दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनानंतर गुरुंग याच्या या कृतीमुळे त्याचं कौतुक होतंय.