Nepal Violence: नेपाळमधील तेलगू नागरिकांचा जीव वाचवला; जाळपोळीचे दृश्य भयावह, आंध्र प्रदेश सरकारचे मदतीचे कार्य
Telugu Citizens: नेपाळमध्ये अडकलेले तेलगू नागरिक काठमांडूत होणाऱ्या दगडफेक आणि जाळपोळीच्या परिस्थितीतून सुरक्षितपणे परतले. आंध्र प्रदेश सरकारने त्यांना घरी पोचवले. नेपाळमधील हिंसाचाराच्या दृष्याने तेलगू नागरिकांना 'दु:स्वप्नासारखे' वाटले, पण आंध्र प्रदेश सरकारच्या मदतीने ते सुखरूप परतले आहेत.
अमरावती (आंध्र प्रदेश): नेपाळमध्ये अडकलेले दीडशेपेक्षा अधिक तेलगू नागरिकांचा जीव वाचवत त्यांना आंध्र प्रदेशात परत आणल्याची माहिती आज टीडीपी सरकारने दिली. पत्रकारांना शेअर केलेल्या व्हिडिओत नागरिकांनी ओढवलेला प्रसंग सांगितला.