थेरेसा मे यांचा वारसदार आज ठरणार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन आणि विद्यमान परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट हे सुरवातीपासून आघाडीवर होते. ​

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचा वारसदार निवडण्यासाठी सुरू असलेली मतदानाची प्रक्रिया काल (सोमवार) संध्याकाळी संपली. आज (मंगळवार) मतमोजणी होणार असून, त्यानंतर ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन आणि विद्यमान परराष्ट्रमंत्री जेरेमी हंट हे सुरवातीपासून आघाडीवर होते. त्यांच्यातच अंतिम मुकाबला होणार असून, या दोघांपैकी एक जण मे यांचा वारसदार ठरणार असल्याचे जवळजवळ निश्‍चित मानले जात आहे.

हुजूर पक्षाचा नेता निवडण्याच्या प्रक्रियेत सुमारे एक लाख 60 हजार सदस्यांचा सहभाग अपेक्षित आहे. काल (सोमवार) संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. आज मतमोजणी होणार असून, त्यानंतर नव्या नेत्याची निवड जाहीर केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New British Prime Minister will be announced today