esakal | भय इथलं संपत नाय; कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरियंट, लसही अप्रभावी
sakal

बोलून बातमी शोधा

भय इथलं संपत नाय; कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट, लसही अप्रभावी

भय इथलं संपत नाय; कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट, लसही अप्रभावी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

जवळपास दीड वर्षांपासून कोरोना महामारीने जगाला विळखा घातला आहे. कोरोनाच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वसामान्याचं हाल होत आहेत. दिवसागणिक कोरोना आपलं रुप बदलत असून नवीन व्हेरियंट समोर येत आहेत. अल्फा, बीटा, गामा, डेल्टानंतर आणखी एक नवीन व्हेरियंट समोर आला आहे. अभ्यासानुसार, कोरोनाच्या या नव्या विषाणूवर लसही अप्रभावी ठरु शकते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO या नव्या व्हेरियंटवर लक्ष ठेवून आहे. WHO ने म्हटलेय की, 'Mu' (B.1.621) या नव्या कोरोना विषाणूवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. हा विषाणू सर्वात आधी जानेवारीमध्ये कोलंबियामध्ये आढळला होता. भारतामध्ये अद्याप या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोलंबियामध्ये हाहा:कार माजवणारा कोरोनाचा Mu हा व्हेरियंट दक्षिण अमेरिका आणि युरोप या देशात आढळला. जागतिक स्तरावर याचा प्रसार 0.1 टक्के इतका आहे. तर कोलंबियामध्ये 39 टक्के इतका प्रसार होतोय, असे WHO ने सांगितले.

'Mu' (B.1.621) या नव्या विषाणूला 'वेरियंट ऑफ इंटरेस्ट'मध्ये वर्गीकृत करण्यात आलं आहे. या नव्या कोरोना विषाणूबद्दलची माहिती WHO ने मंगळवारी दिली. यावेळी त्यांनी सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'Mu' (B.1.621) या नव्या विषाणूमध्ये असं म्यूटेशन आहे की, जे लसीलाही चकवा देऊ शकते. लस घेतल्यानंतरही 'Mu' (B.1.621) हा नवा कोरोना विषाणू प्रभावित ठरु शकतो. यावर आणखी अभ्यास करण्याची गरज असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले आहे.

हेही वाचा: विणाबद्दल अश्लिल शब्दांचा वापर, शिव ठाकरेने घडवली अद्दल

SARS-CoV-2 सह सर्व कोरोना विषाणू काळानुरुप आपलं रुप बदलत असून अधिक घातक होत आहेत. परंतु काही उत्परिवर्तन व्हायरसच्या गुणधर्मांवर परिणाम करू शकतात. तसेच हे विषाणू किती सहजपणे पसरु शकतात, तेही समजेल. विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे रोगाची तीव्रता वाढवते आणि लसीचा प्रभाव कमी करण्यासह अनेक समस्या निर्माण करते, असे अभ्यासातून दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं सध्याच्या चार कोरोना विषाणूंना सर्वात घातक आणि चिंतेच कारण असल्याचं म्हटलेय. यामध्ये अल्फा, जो 193 देशात पसरला आहे. डेल्टा, जो 170 देशात पसरला आहे. असं म्हटले जातेय की, WHO सध्या Mu या नव्या व्हेरियंटसह पाच कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तणावर लक्ष ठेवून आहे.

loading image
go to top