esakal | विणाबद्दल अश्लिल शब्दांचा वापर, शिव ठाकरेने घडवली अद्दल
sakal

बोलून बातमी शोधा

विणाबद्दल अश्लिल शब्दांचा वापर, शिव ठाकरेने घडवली अद्दल

विणाबद्दल अश्लिल शब्दांचा वापर, शिव ठाकरेने घडवली अद्दल

sakal_logo
By
नामदेव कुंभार

बिग बॉस मराठी या लोकप्रिय शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वीणा जगताप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील खास क्षण वीणा चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करते. चाहतेही फोटो आणि व्हिडिओंना भरघोस प्रतिसाद देतात. पण जिथे लोकप्रियता आली तिथे वाईट बोलणारे किंवा ट्रोल करणारे युजर्सही येतात. हे ट्रोलर्स कलाकारांना ट्रोल करण्याची संधी शोधत असतात. वीणादेखील या ट्रोलर्सना कंटाळली आहे. ट्रोलर्सला विणाने चांगलेच झापले आहे. एका युजर्सने विणा जगतापला आक्षेपार्ह अश्लिल शब्दात टिप्पणी केली होती. त्यामुळे संतापलेल्या विणाने त्या ट्रोलर्सला अद्दल घडवली आहे.

अभिनेत्री विणा जगताप हिला युजर्सने अर्वाच्य भाषेत टिप्पणी केली होती. त्यावर विणा जगताप हिचा संताप अनावर आला. इन्स्टाग्रामवर त्या युजर्सच्या माहितीसह पोस्ट करत वीणाने चांगलंच सुनावलं आहे. तुमच्याकडे काही नैतिकता आहे का? असा सवाल करत हे मी खपवून घेणार नाही.. असा इशारा विणाने आपल्या इन्स्टा पोस्टद्वारे युजर्सला दिला आहे. त्या युजर्सने मला माझ्या रेट विषयी विचारलं अन् नंतर मेसेज डिलिट केला, त्यामुळे मी स्क्रीनशॉट घेऊ शकले नाही, असेही विणाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय. एखाद्याला ट्रोल करणं अथवा शिविगाळ करणे कायदेशीर नाही. यामुळे एखाद्याला मानसिकरित्या हानी पोहोचू शकते. अशी ट्रोलिंग व्यक्तीला स्वतःचा जीव घेण्यास प्रोत्साहित करू शकते, असा संताप विणाने आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलाय. जे विणाला डीएममध्ये मेसेज करतात. विणा म्हणते, तुम्हाला असे वाटत असेल की डीएममध्ये मेसेज केला तर कुणाला समजणार नाही, तर अशांनाही मी सोडणार नाही.

हेही वाचा: गॅस सिलिंडर पुन्हा महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

विणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि टिप्पणी करणाऱ्या चाहत्याला चांगचाल धडा शिकवला आहे. त्या युजर्सचं नाव @satyajit_12333 असं असून. या प्रकारानंतर त्यानं आपलं युजर्स आयडी बदलले आहे. विणाला या लढाईल प्रियकर शिव ठाकरे यानेही मदत केली आहे. शिव ठाकरे याने त्या युजर्सला शोधून काढलं असून माफी मागायला भाग पाडलं आहे. शिव ठाकरेनीही एक इन्स्टा पोस्ट करत इशारा दिला आहे.

मुलीवर काहीही कमेंट कराल आणि त्याची कुणीही दखल घेणार नाही हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. अवध्या एका तासात सगळी माहिती मिळवली म्हणजे विचार करा. परत असं काही झाल्यास त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील, असा इशारा शिव ठाकरे याने दिला आहे.

वीणा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून 'राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळूबाई', 'बिग बॉस' यांसारख्या कार्यक्रमात झळकली आहे.

loading image
go to top