China Faces HMPV : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या संसर्गाचे सावट;रुग्णालयांमधील गर्दीची छायाचित्रे व्हायरल
China Health Crisis : कोरोना महामारीमुळे जग त्रस्त असताना चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषयी अद्याप अधिकृत निवेदन दिलेले नाही, मात्र व्हायरल व्हिडिओ आणि छायाचित्रांमधून रुग्णालयांमधील गर्दी दिसत आहे.
बीजिंग : कोरोना विषाणूच्या साथीतून जग सावरलेले असताना चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे कोरोनानंतर पाच वर्षांनी पुन्हा आणखी एका आरोग्य संकट येणार का, अशी शंका व्यक्त होत आहे.