कोरोनामुळे हज यात्रेकरूंसाठी सौदी अरेबिया सरकारचे नवे नियम

वृत्तसंस्था
Wednesday, 8 July 2020

यंदा केवळ एक हजार भाविकांना परवानगी आहे. यात्रेदरम्यान भाविक झमझम विहीरीतील पाणी पितात. यावेळी सरकारने हे पाणी प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये भरले असून तेच पिणे बंधनकारक आहे.

रियाध : कोरोनामुळे सौदी अरेबियाने यंदाच्या हज यात्रेसाठी विदेशातून येणाऱ्या भाविकांना बंदी घातल्यानंतर आता त्यांनी हज यात्रेत सहभागी होणाऱ्या आपल्या देशातील भाविकांसाठीही नवे नियम जाहीर केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

यंदा केवळ एक हजार भाविकांना परवानगी आहे. यात्रेदरम्यान भाविक झमझम विहीरीतील पाणी पितात. यावेळी सरकारने हे पाणी प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये भरले असून तेच पिणे बंधनकारक आहे. तसेच, सैतानाला दगड मारण्यासाठी भाविक यात्रेदरम्यान रस्त्यातील दगड उचलून मारतात. यावेळी ठिकठिकाणी सॅनिटायझरने स्वच्छ केलेले आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेल्या दगडांचाच वापर करायचा आहे. तसेच, नमाज पठणासाठी खाली अंथरण्यासाठीची चादरही स्वत:चीच आणायची आहे. 

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांना करोनाची लागण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New rules of Saudi government for Hajj pilgrims due to Corona

Tags
टॉपिकस
Topic Tags: