New Year Celebration In Space : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी झिरो ग्रॅव्हिटीत सजलं अंतराळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year Celebration In Space

New Year Celebration In Space : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी झिरो ग्रॅव्हिटीत सजलं अंतराळ

New Year Celebration In Space : नव्या वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन सगळीकडे दिसून आलं. कोणी घरच्या घरी पार्टी करत तर कोणी ट्रीप काढत नवं वर्ष सेलिब्रेट करताना दिसताय. मात्र अंतराळातील आगळ्यावेगळ्या नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताय.

तीन रशियन अंतराळवीर सर्गेई प्रोकोपिएव्ह, अण्णा किकिना आणि दिमित्री पेटलिन यांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सजवले. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक रशियाच्या अंतराळवीरांनी झिरो ग्रॅव्हिटीमध्ये सजवले आहे. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो समोर आले आहेत.

नवीन वर्षाच्या संध्याकाळी सजलं संपूर्ण जग

दुसरीकडे चीन, अमेरिकेपासून फ्रान्स, ऑस्ट्रेलियापर्यंतच्या लोकांनी नवीन वर्ष साजरे केले. रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजीही झाली, ज्याने आकाश उजळून निघाले आणि सुंदर दृश्य आकाशात दिसू लागले. न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात नवीन वर्ष म्हणजेच २०२३ साजरे करण्यात आले. या दरम्यान, ऑकलंडचा सर्वात प्रसिद्ध स्काय टॉवर चमचमणाऱ्या दिव्यांनी सजवण्यात आला होता. (New Year Celebration)

कोविडचा धोका कायम असताना चीनमध्येही न्यू इयर सेलिब्रेशन दणक्यात

कोविड संकट असूनही चीनमध्ये नवीन वर्ष 2023 मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. पार्टीदरम्यान लोक खूप आनंदी दिसत होते आणि एकमेकांसोबत सेल्फी घेताना दिसले. नवीन वर्ष 2023 च्या पार्टीमध्ये लोक आकाशात उडणारे फुगे सोडतानाही दिसले.