New Zealand New Visa Rules: न्यूझीलंडच्या व्हिसा नियमांचा भारतीयांना मोठा झटका; जाणून घ्या काय आहेत नवे बदल

New Zealand Visa Rules: न्यूझीलंड सरकारने रविवारी (7 एप्रिल) देशातील परदेशी कामगारांची संख्या कमी करण्यासाठी व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.
New Zealand New Visa Rules
New Zealand New Visa Rulessakal

New Zealand New Visa Rules: न्यूझीलंड सरकारने रविवारी (7 एप्रिल) देशातील परदेशी कामगारांची संख्या कमी करण्यासाठी व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. न्यूझीलंड सरकारने व्हिसा नियमांमध्ये बदल केल्याने भारतीय कामगारांना मोठा झटका बसला आहे. स्पुतनिकच्या रिपोर्टनुसार, 2023 मध्ये 173,000 स्थलांतरित कामगार न्यूझीलंडमध्ये आले, त्यापैकी 35 टक्के भारतीय होते. दरम्यान, रविवारी जाहीर झालेल्या बदलांनंतर हे स्पष्ट झाले आहे की, स्थानिकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यास न्यूझीलंड सरकारचे प्राधान्य असणार आहे.

इमिग्रेशन सेक्रेटरी एरिका स्टॅनफोर्ड यांनी नवीन नियमांबद्दल सांगितले की, "हा बदल एक उत्तम इमिग्रेशन पॉलिसी तयार करण्यासाठी करण्यात आला आहे.'' ते पुढे म्हणाले की, ''प्रस्तावित बदलाचा मूळ उद्देश स्थानिक कामगारांमध्ये गुणवत्ता वाढवून त्यांचं स्थलांतर कमी करणे आहे.'' स्टॅनफोर्ड यांनी पुढे स्पष्ट केले की, यातील बरेच बदल नवीन नाहीत. हे बदल व्यावसायिक गरजा आणि राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये संतुलन राखतात.

New Zealand New Visa Rules
New Zealand MP : 'माझ्या मतदारांसाठी जीवही देईल..'; न्यूझीलंडच्या संसदेत तरुणीचं 'माओरी'मधील खणखणीत भाषण व्हायरल

दरम्यान, इमिग्रेशन मंत्री म्हणाले की 'आमच्या इमिग्रेशन पॉलिसीमध्ये सुसंगतपणा आणण्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत.' माध्यमिक शिक्षकांसारख्या उच्च-कुशल स्थलांतरितांना आकर्षित करणे आणि त्यांना कायम ठेवण्यावर भर देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असेही ते पुढे म्हणाले. त्याचवेळी, आम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की, जिथे कौशल्याची कमतरता नाही, तिथे न्यूझीलंडवासीयांना पहिल्यांदा प्राधान्य द्यावे लागेल.

New Zealand New Visa Rules
America Issues Security Alert : रशियातील अमेरिकन नागरिकांना अलर्ट; गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन, नेमकं कारण काय?

नवीन बदल काय आहेत?

नवीन बदलांतर्गत, स्तर 4 आणि 5 वर काम करणाऱ्या कामगारांसाठी किमान इंग्रजी भाषा पात्रता निश्चित करण्यात आली आहे. व्हिसा मिळवणाऱ्यांना आता बहुतांश नोकऱ्यांसाठी किमान कौशल्ये आणि कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे. कमी-कुशल नोकऱ्या पहिल्यांदा स्थानिकांनी देण्यात येणार आहेत. त्यामुळे व्हिसाचा कालावधी 5 वरुन 3 वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे. फ्रँचायझी मान्यता श्रेणी देखील रद्द केली जाईल. परदेशी कामगारांना कामावर ठेवण्यासाठी कंपन्यांनी योग्य निकष आणि ट्रायड रोजगार मान्यता प्रक्रियांचे पालन केले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com