esakal | सलग तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड हादरलं; नॉर्थ आयर्लंडला 6.4 रिश्टर स्केलचा धक्का

बोलून बातमी शोधा

earthquake.jpg}

न्यूझीलंडमध्ये शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले. अमेरिकेतील भूगर्भ सर्व्हेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सलग तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड हादरलं; नॉर्थ आयर्लंडला 6.4 रिश्टर स्केलचा धक्का
sakal_logo
By
टीम ई सकाळ

वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये शनिवारी पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले. अमेरिकेतील भूगर्भ सर्व्हेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी असल्याचं सांगण्यात आलं आहे. नॉर्थ आयर्लंडला या भूकंपाचे धक्के बसले. गेल्या तीन दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

भूकंपाचे केंद्र उत्तर पूर्वेकडील शहर गिसबार्नेपासून 181 किमी अंतरावर आहे. भूकंपाचे धक्के बसले असले तरीही कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. तसंच त्सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गेल्या काही दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुवारी रात्रीही 8.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यानंतर प्रशासनाने समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थानी जाण्याचं आवाहन केलं होतं.