esakal | न्यूझीलंड : सुपरमार्केटमध्ये हल्ला; 60 सेकंदात दहशतवाद्याचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूझीलंड : सुपरमार्केटमध्ये हल्ला; 60 सेकंदात दहशतवाद्याचा खात्मा

न्यूझीलंड : सुपरमार्केटमध्ये हल्ला; 60 सेकंदात दहशतवाद्याचा खात्मा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

न्यूझीलंडच्या ऑकलँड शहरात दहशतवादी हल्ला झाला आहे. येथील New Lynn या सुपरमार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी अचानक एका व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑकलँड पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या 60 सेकंदात दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय.

एका अज्ञात हिंसक व्यक्तीने सकाळी दहशतवादी हल्ला केला. निष्पाप न्यूझीलंडवासीयांवर हा भ्याड हल्ला करण्याचे दहशतवाद्याचे इरादे पोलिसांनी अवघ्या 60 सेकंदात धुळीस मिळवले, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी दिली. या दहशतवादी हल्ल्यात सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचीही माहिती जेसिंडा आर्डेन यांनी दिली.

न्यझीलंडचे पोलिस आयुक्त अँड्र्यू कोस्टर यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. अँड्र्यू कोस्टर म्हणाले की, New Lynn या सुपरमार्केटमध्ये एका व्यक्तीने हल्ला केला. त्याचवेळी पाळत ठेवणाऱ्या विशेष पथकाने पाहिलं. त्यानंतर पोलिसाच्या पथकाने त्या हल्लोखोराचा खात्मा केला.

loading image
go to top