चार दिवसांचा वर्कवीक करा; पंतप्रधानांचा कंपन्यांना सल्ला

New Zealands Prime Minister Touts 4 Day Week To Boost Domestic Tourism
New Zealands Prime Minister Touts 4 Day Week To Boost Domestic Tourism

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यांनी कंपन्यांना कामाचा आठवडा ४ दिवसांचा करण्याबाबत सुचवलं आहे. जसिंडा म्हणतात की यामुळे पर्यटनाला चालना मिळेल तसेच कामकाजात लवचिकता आल्यामुळे उत्पादकता वाढेल. या व्यतिरिक्त, वर्क लाईफ देखील बॅलेन्स राहिल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर न्यूझीलंड पुन्हा रुळावर धावण्यास सज्ज झाला आहे. यावेळी पंतप्रधान जसिंडा यांनी एका फेसबुक लाइव्ह व्हिडिओमध्ये म्हटले ही सूचना केली असून, देशभरातून अनेक लोक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि स्वदेशी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सूचना घेऊन आले होते. लोकांचं म्हणणं आहे की ४ दिवसांचा वर्क वीक असावा. कंपन्यांच्या मालकांनी याचा विचार करावा. याचा देशाला मोठा फायदा होईल.
--------
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला; पोलिस हुतात्मा
--------
विमानप्रवासासाठी मार्गदर्शक सूची जाहीर; सेतू ऐपविषयी महत्वाची घोषणा
--------
कोरोनामुळे देशाच्या पर्यटन व्यवसायात मोठी घसरण झाली आहे. तसेच इतर देशातील नागरिकांसाठी देशाच्या सर्व सीमा बंद आहेत. त्यामुळे पर्यटनातून येणार महसूल सध्या बंद आहे. 'जर लोकांना याबद्दल विचार करण्यास खरोखर प्रोत्साहित करते. तुम्ही मालक असाल आणि तसे करण्याच्या स्थितीत असाल तर या मार्गाने निश्चितच संपूर्ण देशातील पर्यटनास मदत होईल, असेही जसिंडा म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com