Video: दात पडले, पण ती बातम्या सांगतच राहिली

सूरज यादव
Saturday, 18 July 2020

मारीचका पाडाल्कोनं तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसंच तिनं या घटनेचा अनुभवही शेअर केला आहे. 

किव्ह - चॅनेलवर लाइव्ह शो सुरु असताना अचानक काहीतरी घडतं. तेव्हा समयसुचकता दाखवत परिस्थिती हाताळावी लागते. एका टीव्ही अँकरने तिच्या पतीच्या  मृत्यूची बातमीसुद्धा लाइव्ह दिली होती. तेव्हा तिने पतीचं निधन झाल्याचं समजल्यावरही त्यानंतरचं बातमीपत्र वाचलं होतं. अशाच काही घटना लाइव्ह शोवेळी घडतात. आता युक्रेनियन ब्रॉडकास्टरला एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागला. मात्र त्यातही प्रसंगावधान राखून तिने शो पूर्ण केला. अँकरचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युक्रेनियन ब्रॉडकास्टर मेरीचका पाडाल्को ही लाइव्ह शोवेळी बातमी वाचत होती. त्यावेळी अचानक एक दात तुटल्याचं तिला जाणवलं. तेव्हा तिने हळूच तो दात दुसऱ्या हाताने काढला. हे करत असताना तिने बातम्यांचे वाचनही सहजपणे केले. तसंच पुढचं बातमीपत्रही वाचलं.

मारीचका पाडाल्कोनं तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसंच तिनं या घटनेचा अनुभवही शेअर केला आहे. तिनं म्हटलं की, गेल्या 20 वर्षांपासून न्यूज प्रेझेंटर म्हणून मी काम करत आहे. माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हा सर्वात विचित्र अनुभव आहे. 

लाइव्ह शोवेळी जेव्हा असा विचित्र प्रकार घडला त्यानंतर सहकाऱ्यांनी तर हे नेहमीचं आहे अशाच पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्याचंही मारीचका म्हणाली. पडलेल्या दाताबद्दल सांगताना मारीचका म्हणाली की, दहा वर्षांपूर्वी माझ्या मुलीने खेळताना गजराचं घड्याळ माझ्याकडे टाकलं होतं. ते नेमक तोंडावर लागलं आणि माझा दात तुटला. तेव्हा दुसरा दात बसवला होता आणि तोच दात बातमी वाचत असताना तुटला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news anchor tooth fall during live show