UN Report: हाय गर्मी! येत्या 5 वर्षात सर्वात कडक उन्हाळा, संयुक्त राष्ट्राचा इशारा

जवळपास संपूर्ण जग उष्णतेने हैराण झाले आहे.
UN Warning Next 5 Years To Be Hottest
UN Warning Next 5 Years To Be HottestSakal
Updated on

UN Warning Next 5 Years To Be Hottest: जवळपास संपूर्ण जग उष्णतेने हैराण झाले आहे. 2023 ते 2027 या काळात आणखी उष्णता वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रीन हाऊस वायू आणि एल निनो यांच्या मिश्रणामुळे तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा बुधवारी संयुक्त राष्ट्रांनी दिला.

युनायटेड नेशन्सच्या जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे की, जागतिक तापमान लवकरच पॅरिस हवामान करारामध्ये निश्चित केलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे.

2015 ते 2022 ही सर्वात उष्ण वर्षे आहेत:

2015 ते 2022 या कालावधीतील आठ सर्वात उष्ण वर्षांची नोंद झाली आहे. मात्र हवामान बदलाच्या वेगामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. World Meteorological Organization (WMO) च्या मते, ''पुढील पाच वर्षांत विक्रमी उष्णतेची नोंद होण्याची 98 टक्के शक्यता आहे.''

2015 च्या पॅरिस करारामध्ये, देशांनी 1850 ते 1900 दरम्यान मोजलेल्या सरासरी पातळीपेक्षा 2°C वर आणि शक्य असल्यास 1.5C वर जागतिक तापमानवाढ मर्यादित ठेवण्यास सहमती दर्शविली. 2022 मध्ये जागतिक सरासरी तापमान 1850-1900 च्या सरासरीपेक्षा 1.15C अधिक होते.

इंडोनेशिया, अॅमेझॉन आणि मध्य अमेरिकेत कमी पाऊस अपेक्षित आहे. त्याऐवजी, उत्तर युरोप, अलास्का आणि सायबेरियामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.

पॅरिस करारामध्ये, देशांनी जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न वाढवण्यास सहमती दर्शविली.

UN Warning Next 5 Years To Be Hottest
Ambani-Adani: दिवाळखोर कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीतून अंबानी आणि अदानी बाहेर

जर जगात एक किंवा दोन दशकांपर्यंत 1.5 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात वाढ झाली तर त्याचे परिणाम भयंकर होतील. मोठ्या उष्णतेच्या लाटा, जंगलातील आग, तीव्र वादळे आणि पूर येण्याची शक्यता अधिक असेल.

युनायटेड नेशन्सने हरितगृह वायू उत्सर्जन 2030 पर्यंत 43 टक्क्यांनी कमी होण्याचे आवाहन केले आहे. जगातील अनेक देश सध्या या कराराचे पालन करण्यात अयशस्वी ठरत आहेत, उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना खूपच कमी आहेत.

UN Warning Next 5 Years To Be Hottest
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com