
नायजेरियातील मध्य बेन्यू राज्यातील येलेवाटा गावात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान १०० जण ठार झाले. शनिवारी अॅम्नेस्टी इंटरनॅशनल नायजेरियाने ही माहिती दिली. शुक्रवारी रात्री उशिरापासून ते शनिवारी पहाटेपर्यंत हा हल्ला सुरू असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अॅम्नेस्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका निवेदनात म्हटले आहे की, 'अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. अनेक लोक जखमी आहेत आणि त्यांना पुरेशी वैद्यकीय मदत मिळत नाही. अनेक कुटुंबांना खोल्यांमध्ये बंद करून जिवंत जाळण्यात आले.'