
भारतीय नागरिक निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. १६ जुलै रोजी तिला फाशी दिली जाणार असून ती टाळण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. निमिषा येमेनमध्ये असताना तिच्यावर येमेनमधील नागरिकाच्या हत्येचा आरोप होता. या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर तिला फाशीची शिक्षा सुनावली आहे.