नीरव मोदीच्या कोठडीत ११ नोव्हेंबरपर्यंत वाढ

पीटीआय
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत येथील न्यायालयाने ११ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारप्रकरणी फसवणुकीच्या आरोपावरून नीरव मोदी सध्या तुरुंगात आहे.

लंडन - फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत येथील न्यायालयाने ११ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारप्रकरणी फसवणुकीच्या आरोपावरून नीरव मोदी सध्या तुरुंगात आहे. 

लंडनच्या तुरुंगातून व्हिडिओ लिंकद्वारे त्याची सुनावणी आज झाली. मोदी याच्या प्रत्यापर्णाससंबंधीची सुनावणी पुढील वर्षी ११ व १५ मे रोजी होणार असल्याचे वेस्टमिनिस्टर न्यायालयाचे न्यायाधीश नीना टेम्पिया यांनी सांगितले. फेब्रुवारीपासू सुरू होणाऱ्या सुनावणीपूर्वी प्रत्येक २८ दिवसांनी त्याने व्हिडिओ लिंकद्वारे हजेरी लावावी, असेही सांगण्यात आले आहे. नीरव मोदी हा केवळ त्याचे नाव, जन्मतारीख सांगण्यासाठीच बोलत असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nirav modi Custody increase