esakal | VIDEO: 'ते माणूस नाहीत, मुस्लिम आहेत'; अमेरिकेत महिलेचा वंशद्वेषावरुन धुमाकूळ

बोलून बातमी शोधा

america

इजिप्शियन-अमेरिकेन नागरिक असलेल्या नाहला इबेद  Nahla Ebaid या आपल्या पतीसोबत शॉपिंगसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांना मुस्लिम द्वेषाचा सामना कराला लागला आहे.

VIDEO: 'ते माणूस नाहीत, मुस्लिम आहेत'; अमेरिकेत महिलेचा वंशद्वेषावरुन धुमाकूळ

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- वंशद्वेष आणि वर्णद्वेषाच्या घटना अमेरिकेमध्ये नवीन नाहीत. विशेषत: मुस्लिमांकडे अमेरिकेमध्ये संशयाच्या नजरेने पाहिले जाते. अनेकदा मुस्लिम व्यक्तींना लक्ष्य करण्यात आल्याच्या घटना अमेरिकेत घडल्या आहेत. असाच एक प्रकार फ्लोरिडातील एका ग्रोसरी स्टोअरमध्ये समोर आला आहे. इजिप्शियन-अमेरिकेन नागरिक असलेल्या नाहला इबेद  Nahla Ebaid या आपल्या पतीसोबत शॉपिंगसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांना मुस्लिम द्वेषाचा सामना कराला लागला आहे. एक महिलेने नाहला इबेद यांच्या कपड्यावरुन त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. अत्यंत असभ्य भाषेत महिलेने नाहला इबेद यांच्यावर टीका केली. इस्त्रायली राज्य करतील कारण तुम्ही मुस्लिम खूप वाईट आहात. तुम्ही पॅलेस्टाईनमध्ये का जात नाही. तू खूप कुरुप आहे, तू असले का कपडे घातले आहेस, अशा प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार करत महिलेने इबेद यांच्यावर हल्लाबोल केला. 'मीडल इस्ट आय'ने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

स्टोअरमधील एका कर्मचाऱ्याने महिलेला विनाकारण मुस्लिम कपलवर आगपाखड न करण्याचा सल्ला दिला. ते माणूस आहेत, त्यांच्यासोबत असं करु नका, असं कर्मचाऱ्याने म्हटलं. यावर त्या महिलेने दिलेली प्रतिक्रिया अत्यंत संतापजनक होती. 'ते माणूस नाहीत, ते मुस्लिम आहेत', असं ती महिला म्हणाली. महिला इतक्यावरच थांबली नाही, तर तिने पोलिसांना फोन केला आणि स्वत:ला धमकी देण्यात आल्याचा आरोप केला. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिस ग्रोसरी स्टोअरमध्ये आले. चौकशी केल्यानंतर पोलिसांना कळालं की, महिला मुस्लिम द्वेषी असून जाणूनबुजून ती कपलला लक्ष्य करत आहे. पोलिसांनी उलट महिलेलाच विचारलं की ती कुठली आहे. महिला युक्रेनियन होती, पोलिसांनी तिला युक्रेनला परत जाण्यास सांगितंल. पोलिसांनी योग्य कारवाई करत मुस्लिम कपलला अटक न करता त्या महिलेलाच बेड्या ठोकल्या. 

Corona Update: राज्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल? कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक

पोलिसांनी बेड्या ठोकताच महिला ताळ्यावर आली. महिलेच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसलं. प्लीज, माझ्यासोबत असं करु नका. मी मुस्लिम द्वेषी नाही. माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी महिलेवर टीका केली आहे. तर पोलिसांनी योग्य व्यक्तीला अटक केल्याबद्दल त्यांचे कौतुक केलं आहे.