नव्या प्रथिनांच्या निर्मितीला नोबेल 

पीटीआय
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

स्टॉकहोम (पीटीआय) : उत्क्रांतीच्या शक्तीचा वापर करून नवी प्रथिने निर्माण करणाऱ्या संशोधनाला या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या प्रथिनांचा वापर जैवइंधनापासून औषधे आणि इतर उपचारांमध्येही करता येणे शक्‍य आहे. फ्रान्सेस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर या तिघांना या वर्षीचे रसायनशास्त्राचे नोबेल रॉयल स्वीडीश ऍकॅडमीने जाहीर केले. डार्विन यांचा उत्क्रांतीच्या सिद्धांताचा वापर प्रत्यक्ष परीक्षानळीत करून नवी प्रथिने तयार करण्याचे काम या तिघा शास्त्रज्ञांनी केले, असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. 

या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या पद्धतीमुळे नवी एन्झाईम आणि नवी प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार करणे शक्‍य झाले. त्यामुळे पर्यावरणस्नेही रसायन उद्योगाकडे वाटचाल करणे शक्‍य होईल; तसेच विविधा आजारांवर उपचार करून मानवी जीवन अधिक समृद्ध करता येऊ शकेल, असे पुरस्कार समितीने म्हटले आहे. 

अरनॉल्ड या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एन्झाइम तयार करण्यासाठी थेटपणे उत्क्रांतीवादाच्या सिद्धांचा वापर करून दाखविला. अरनॉल्ड या नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या अमेरिकेच्या केवळ पाचव्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी अदा योनाथ (2009), डोरोथी क्रोफूट हॉजकिन (1964), आयरिन जोलिओट क्‍युरी (1935) आणि त्यांची आई मेरी क्‍युरी (1911) यांना पुरस्कार मिळाला आहे. 

स्मिथ हे मिसुरी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी फेज डिस्प्ले ही पद्धत विकसित केली त्याद्वारे नवी प्रथिने निर्माण करणे शक्‍य झाले. सर विंटर हे ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी नव्या अँटिबॉडी शोधून काढल्या. त्याचा उद्देश नवी औषधे तयार करण्यासाठी होता. या अँटिबॉडीजच्या साह्याने विषद्रव्यांचा प्रभाव नष्ट करता येऊ शकतो. 
पुरस्कार्थींना 90 लाख स्वीडीश क्रोनर देण्यात येणार आहेत. त्यापैकी निम्मी रक्कम अरनॉल्ड यांना, तर उर्वरित निम्मी रक्कम स्मिथ आणि विंटर यांना विभागून देण्यात येणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobel in the formation of new proteins