
स्टॉकहोमः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शांततेच्या नोबेल सन्मानाचे स्वप्न अखेर भंगले असून व्हेनेझुएलातील विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना मचाडो या जागतिक कीर्तीच्या सन्मानाच्या मानकरी ठरल्या आहेत. लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच देशातील हुकुमशाहीविरोधात लढा देण्याचे काम मचाडो यांनी केले. हमास आणि इस्राईल यांच्यातील संघर्ष थांबविण्यासाठी मध्यस्थी करणारे ट्रम्प हे या सन्मानाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. नोबेल समितीने मचाडो यांच्या कार्याचा गौरव केला आहे.