Nobel Prize : स्वंते पाबो यांना 2022चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nobel Prize 2022 Physiology Medicine awarded to Svante paabo

Nobel Prize : स्वंते पाबो यांना 2022चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize : 2022 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार स्वंते पाबो यांना जाहीर झाला आहे. शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील संशोधनामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. विलुप्त होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या जीनोमशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. विज्ञान जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो, तो स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल असेंब्लीद्वारे हा प्रदान केला जातो.

हेही वाचा: Shivsena : 'मन मोठं करून जसं शिवाजी पार्क दिलं तशी सत्ताही द्या'

स्वंते पाबो एक स्वीडिश जेनेटिस्ट (Geneticist)आहेत जे उत्क्रांती अनुवांशिकतेमध्ये तज्ञ आहेत. पॅलेओजेनेटिक्सच्या संस्थापकांपैकी एक म्हणून, त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.

नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी

हा पुरस्कार अशा वेळी देण्यात आला आहे जेव्हा कोविड महामारीमुळे सर्वांचे लक्ष वैद्यकीय संशोधनाकडे वळले आहे. या घोषणेनंतर मंगळवारी भौतिकशास्त्राचे नोबेल, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्याचे नोबेल पारितोषिक दिले जाणार आहे. नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी होणार असून अर्थशास्त्र पुरस्काराची घोषणा 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

टॅग्स :global newsnobel prize