ऐन युद्धात उत्तर कोरियाचे स्पाय कॅमेरे अ‍ॅक्शन मोडमध्ये | Russia Ukraine War | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kim Jong Un

ऐन युद्धात उत्तर कोरियाचे स्पाय कॅमेरे अ‍ॅक्शन मोडमध्ये

सोल : उत्तर कोरियाने टोही या स्पाय सॅटलाईटवर लावण्यात आलेल्या कॅमऱ्यांची चाचणी केल्याची माहिती सोमवारी(२८ फेब्रुवारी) जाहीर केली. उत्तर कोरियानी दिलेल्या या माहितीनुसार, ते लांबच्या अंतरावरील रॉकेटच्या चाचणीची योजना आखू शकतात आणि त्याद्वारे त्यांच्या शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. (North Korea clarifies that they tested cameras for spy satellite )

संपूर्ण जगाचं लक्ष सध्या रशिया-युक्रेन युद्धावर लागून राहिलेलं आहे. यादरम्यानच आता उत्तर कोरियाने एका महिन्याच्या अवधीनंतर काल रविवारी समुद्रामध्ये एक बॅलिस्टीक मिसाईलचे परिक्षण केले आहे. याबाबतची माहिती कोरियाच्या शेजारी राष्ट्रांनी दिली आहे. पण, उत्तर कोरिया कोणत्याही मिसाईल प्रक्षेपण केल्याचे मान्य केले नाही. उत्तर कोरियाला अशाा कोणत्याही चाचणीसाठी बंदी टाकण्यात आली. अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारीच्या चाचणीमध्ये टोही या स्पाय सॅटलाईटवरील कॅमऱ्याची चाचपणी करण्यात आले, ज्याच्या मदतीने पृथ्वीवरील एक विशिष्ट ठिकाणाचे उभे (Vertical) आणि तिरके (oblique) फोटो घेण्याचा उद्देश आहे.''

हेही वाचा: Russia-Ukraine War : लग्न होताच दाम्पत्याला हाती घ्यावी लागली बंदूक

राज्य माध्यमांनी देखील कोरियामध्ये द्वीपकल्पाचे फोटो जाहीर केले जे अंतराळातून घेतल्याचे दिसत आहे.

उत्तर कोरियाच्या या तांत्रिक माहितीची स्वतंत्रपणे खात्री केली जाऊ शकत नाही, पण मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने अंतरिक्षमधील फोटो घेण्यासाठी एक रॉकेट किंवा मिसाईल लॉन्च केली असण्याची शक्यता आहे.

स्पाय सॅटेलाईट हा अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणालींच्या मालिकेंपैकी एक आहे ज्याला उत्तर कोरियाचे नेता किम जोंग उन यांने गेल्या वर्षी लष्करी आधुनिकीकरण योजनेंतर्गत विकसित करण्याचे वचन दिले होते.

हेही वाचा: तळीरामांचाही युक्रेनला पाठिंबा; गटारांमध्ये ओतला रशियन व्होडका!

सॅटेलाईटला कक्षेत ठेवण्यासाठी लांब पल्ल्याच्या रॉकेट प्रक्षेपणाची आवश्यकता असते, परंतु संयुक्त राष्ट्रांनी उत्तर कोरियाला अशा क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे कारण बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि सॅटेलाईट प्रक्षेपण वापरण्यासाठी डिझाइन केलेले रॉकेट्स समान आवरण, इंजिन आणि इतर तंत्रज्ञान सामाविष्ट असते.

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने म्हटले आहे की, उत्तर कोरियाच्या सॅटलाईल विकासामध्ये या चाचणीला खूप महत्त्व आहे, कारण नॅशनल एयरोस्पेस डेव्लपमेंट अॅ़डमिनिस्ट्रेशनने "हाय-डेफिनिशन फोटोग्राफी सिस्टम, डेटा ट्रान्समिशन सिस्टम आणि अॅटिट्यूड कंट्रोल डिव्हाइसेसची वैशिष्ट्ये आणि अचूकता" याची पुष्टी केली आहे.

आणि संरक्षण विज्ञान अकादमीच्या वारंवार अपयशानंतर, उत्तर कोरियाने 2012 मध्ये आपला पहिला उपग्रह आणि दुसरा 2016 मध्ये यशस्वीरित्या कक्षेत प्रक्षेपित केला. उत्तर कोरियाने म्हटले की दोन्ही पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहेत आणि त्यांचे प्रक्षेपण शांततापूर्ण अंतराळ विकास कार्यक्रमाचा भाग होते.

हेही वाचा: Ukraine Russia War LIVE : विद्यार्थ्यांनो रेल्वे स्थानकांवर जा, भारतीय राजदूतांचा सल्ला

उत्तर कोरिया करतोय शस्त्र तंत्रज्ञानामध्ये सुधारणा

यावर्षी उत्तर कोरियाने केलेलं हे आठवं शस्त्र परीक्षण आहे. तसेच 30 जानेवारीनंतर करण्यात आलेलं हे पहिलं परीक्षण आहे. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, उत्तर कोरिया आपल्या शस्त्र तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करत आहे.

उत्तर कोरियाचा अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न

अमेरिकेसोबत मोठ्या काळापासून थांबलेल्या चर्चेच्या दरम्यान प्रतिंबधांपासून मुक्ती मिळावी, यासाठी दबाव निर्माण करत आहे. अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी उत्तर कोरिया युक्रेन-रशिया संघर्षात अमेरिकेच्या सहभागाचा वापर करून चाचण्या वाढवू शकतो, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी सांगितले की, उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र पूर्व किनारपट्टी आणि जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर पडण्यापूर्वी त्याने सुमारे 600 किलोमीटर उंचीवर सुमारे 300 किलोमीटरपर्यंत उड्डाण केले होते.

Web Title: North Korea Clarifies That They Tested Cameras For Spy Satellite

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..