Ukraine Russia : युरोपीयन संघाच्या सदस्यत्वासाठी युक्रेनचा अर्ज

Ukraine
Ukraine

युक्रेन-रशिया युद्धाचा (Ukraine Russia War) आज पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून रशिया युक्रेनच्या एक-एक शहरांवर हल्ला चढवत आहे. राजधानी किव्हमध्ये देखील चिंताजनक स्थिती असून बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. युरोपियन युनियनने रशियाच्या विमानांना हवाई मार्ग वापरण्यास बंद घातली असून कोरोना लस स्पुटनिकवर देखील बंद घातली आहे. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये तब्बल चार तास बेलारुसमध्ये बैठक पार पडली. अद्याप या बैठकीत काय चर्चा झाली, कुणी काय मागण्या केल्या याबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी युरोपियन संघात युक्रेनच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. या सदस्यत्वासाठीच्या अर्जावर त्यांनी स्वाक्षरी केल्याची घोषणा युक्रेनच्या संसदेने केली आहे.

संयुक्त राष्ट्राचा महासभेत बोलताना महासचिव गुटरेस यांनी सांगितलं की, आता खूप झालं, सैनिकांनी आता त्यांच्या बराकीत परत येण्याची गरज आहे. रशियन अणु बॉम्ब दलांना हाय अलर्टवर ठेवणं हे चिंताजनक असल्याचं त्यांनी म्हटलं.

Ukraine
युक्रेनमध्ये अडकले भारतीय; PM मोदींनी पुन्हा बोलावली उच्चस्तरीय बैठक

युक्रेनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं ११ वे आपत्कालीन विशेष अधिवेशन सुरु केलं आहे.संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटानिओ गुटरेस यांनी म्हटलं की, युक्रेनमधील युद्ध कोणत्याही परिस्थितीत बंद व्हायला हवं.

युक्रेनमधील दुसरं मोठं शहर असलेल्या खार्किवमध्ये रशियन सैनिकांनी गोळीबार केला आहे. यामध्ये किमान ११ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

रशियाने त्यांचे सैन्य मागे घ्यावं अशी मागणी युक्रेनने केली. बेलारूसमध्ये चार तास चर्चा झाली. यावेळी युक्रेनने त्यांची भूमिका मांडली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या शिष्टमंडळात दोन्ही देशातील संघर्षावर चर्चा झाली. युक्रेनमधून रशियन सैन्य मागे घ्यावं आणि क्रिमीया, डॉनबासमधूनही सैन्य काढून घेण्याची मागणी होती. युरोपियन महासंघाचं सदस्यत्व देण्यासंदर्भात मागणी युक्रेनने केली असल्याचं समजते.

Ukraine
रशिया-युक्रेन युद्धात उतरणार तिसरा देश?

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालायने दावा केला आहे की, गेल्या ४ दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धात त्यांनी रशियाची २९ विमाने पाडली आहेत. तसंच १९१ रणगाडे उद्ध्वस्त केले आहेत. रशियाने या युद्दात आतापर्यंत ५ हजार ३०० सैनिक गमावले असल्याचंही ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रशियाने ब्रिटन, जर्मनीसह ३६ देशांच्या एअरलाइन्सच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे.

नाटोचे सदस्य युक्रेनला हवाई संरक्षण देणारी मिसाइल आणि अँटी टँक शस्त्रास्त्रे पुरवत असल्याची माहिती नाटोच्या प्रमुखांनी दिली आहे. तसंच युक्रेनच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितले.

बेलारुसमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चेला साडेतीन सुरुवात झाली.

भारतीय अधिकाऱ्यांना जितकी माहिती आहे तितकीच माहिती आम्हालाही आहे. भारताला त्यांच्या विद्यार्थ्यांची सुटका करायची आहे तर आम्हाला युद्ध थांबवून रशियावर दबाव टाकायचा आहे. आम्ही सतत भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि दोन्ही देशांना शांतता हवीय असं युक्रेनच्या राजदूतांनी सांगितले.

रशियन विमानांसाठी युरोपचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. त्याचा रशियन अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. रशियामध्ये पूर्णपणे अभूतपूर्व जीवितहानी होत आहे. सुमारे 5,300 रशियन सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत, असा दावा भारतातील युक्रेनचे दुतावास डॉ. इगोर पोलिखा यांनी केलं आहे.

युक्रेनमध्ये आतापर्यंत ३७६ जणांचा मृत्यू -

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमध्ये ३७६ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ९४ सैनिकांचा समावेश असल्याचं यूएन मानवाधिकार कार्यलयाने सांगितल्याचं वृत्त रॉयटर्सच्या हवाल्यानं एएनआयनं दिलं आहे.

रशियानं युक्रेनची दोन शहरं ताब्यात घेतली -

रशियन सैन्याने युक्रेनच्या आग्नेय झापोरिझ्झ्या प्रदेशातील बर्द्यान्स्क आणि एनरहोदर शहरांचा ताबा घेतला आहे.

युक्रेनचे शिष्ठमंडळ चर्चेसाठी बेलारुसा पोहोचले -

युक्रेनचे एक शिष्टमंडळ रशियन प्रतिनिधींशी चर्चेसाठी बेलारशियन सीमेवर आले आहे, असे युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे. याबाबत रॉयटर्सने वृत्त दिलं आहे.

ग्रिसने रशियन विमानांना घातली बंदी -

युरोपियन युनियनच्या निर्णयापाठोपाठ ग्रीसने सोमवारी सर्व रशियन विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. याबाबत देशाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने रॉयटर्सने माहिती दिली आहे.

रशियानं व्याजदर केला दुप्पट -

रशियाच्या सेंट्रल बँकेने महागाई कमी करण्यासाठी आणि रुबल चलन नियंत्रित ठेवण्यासाठी मुख्य व्याजदर दुप्पट केला आहे, असं वृत्त बीएनओ न्यूजनं दिलं आहे.

बेलारुसने वचन मोडलं, युक्रेनवर हवाई हल्ले -

रशियाने युक्रेनमधील झायटोमिर विमानतळावर हल्ला करण्यासाठी इस्कंदर क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केला आहे. रशियान बेलारूसमधून युक्रेनवर हवाई हल्ले केले आहे. यापूर्वीच रशियाला आपल्या प्रदेशातून हवाई हल्ल्यांना परवानगी देणार नाही, असं बेलारुसने म्हटले होते. पण, आता बेलारुसने वचन मोडलं आहे. याबाबत द कीव इंडिपेंडंट वृत्त दिले आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये आणण्यात आले.
भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडमध्ये आणण्यात आले.Twitter

भारतीय राजदूतांचा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना सल्ला -

युक्रेनची राजधानी कीव्हमधील विकेंड कर्फ्यू उठवण्यात आला असून विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्याचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन विशेष रेल्वे गाड्या चालवत आहे, अशी माहिती युक्रेनमधील भारतीय राजदूतांनी दिली.

पोलंडच्या निर्वासितांच्या शिबिरामधील भारतीय विद्यार्थी
पोलंडच्या निर्वासितांच्या शिबिरामधील भारतीय विद्यार्थीTwitter

रशियाचा सहकारी देश असलेला बेलारुस आता रशियाच्या समर्थनार्थ युक्रेनमध्ये फौजा पाठवणार असल्याचं वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिलं आहे. त्यामुळे युद्धात आता तीन देश असतील.

पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मिशन गंगा हाती घेण्यात आलं आहे. या मोहिमेचं समन्वय साधण्यासाठी काही केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारीला देशांमध्ये पाठवण्याची शक्यता आहे, अशी माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

बायडन यांनी बोलावली बैठक -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन सोमवारी युक्रेनवर नाटो, युरोपियन युनियन, यूके, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड, जपान आणि रोमानियाच्या नेत्यांसोबत बैठक आयोजित केली आहे.

पवारांची परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा -

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली आहे. बेलगॉर्ड या रशियन शहराच्या मार्गाने विद्यार्थ्यांना बाहेर काढता येईल. रोमानिया-पोलंड सीमेवर जे विद्यार्थी अडकले आहेत त्यांना लवकर मदत व्हावी. तसेच सीमेवर योग्य वागणूक मिळावी, असं पवार जयशंकर यांना म्हणाले.

राजधानी कीव्हवर आज हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर बाजारावर युद्धाचा परिणाम झाला असून आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला आहे. सेन्सेक्स ७५० अंकानी कोसळला असून निफ्टी २०० अंकांनी कोसळला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि पोलंडचे अध्यक्ष अँड्रेज डुडा यांच्यासोबत चर्चा झाली असून रशियाचं आक्रमणाविरोधात पावले उचलण्यास सहमती दर्शवली असल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलं.

पाचवे विमान दिल्लीत दाखल -

रोमानिया येथून निघालेले पाचवे विमान आज सकाळी दिल्लीत दाखल झाले. या विमानातून २४९ भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत.

रशियाचं चलन रुबलच्या मुल्यामध्ये ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन आणि G7 देशाच्या अर्थमंत्र्यांनी युक्रेनचे अर्थमंत्री डिमित्रो कुलेबा यांच्या चर्चा केली. यावेळी सर्वांनी युक्रेनला एकजुटीनं पाठिंबा देण्याचं मान्य केलं. तसेच या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरून युक्रेनला सुरक्षेसह आर्थिक सहाय्य देण्याचे ठरवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com