सोल : मदतीवरून किम जोंग संभ्रमात

कोरोनाचा उद्रेक ; देशभरात पंधरा लाख नागरिक आजारी
North Korea corona update  Kim Jong-un in confusion Fifteen lakh citizens ill
North Korea corona update Kim Jong-un in confusion Fifteen lakh citizens illsakal

सोल : उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांनी आतापर्यंत एककल्ली कारभार केला आहे. कोणतिही आंतरराष्ट्रीय मदत न घेता स्वतंत्र रणनितीचा अवलंब केला. परंतु आता कोरोनासारख्या गंभीर आजारामुळे देशातील नागरिकांचे आरोग्य संकटात सापडले आहे. या स्थितीमुळे किम जोंग उन हे द्विधा मनःस्थितीत अडकले असून परदेशातून मदत घ्यायची की कोरोनामुळे होणारे संभाव्य मृत्यूचे आघात सहन करत स्वत:च्या हिंमतीवर कोरोनाचा मुकाबला करायचा, या विचारात आहेत.

सोलच्या क्यूंगनाम विद्यापीठाचे प्रोफेसर लिम इउल चुल म्हणाले, की किम जोंग सध्या द्विधा मनस्थितीत अडकलेले आहेत. वास्तविक ही त्यांच्यासाठी मोठी समस्या आहे. जर त्यांनी अमेरिका किंवा पश्‍चिमी देशाची मदत घेतली तर त्यांच्या भूमिकेला धक्का बसू शकतो आणि परिणामी जनतेचा विश्‍वास कमी होऊ शकतो. अर्थात कोणतेच पाऊल न उचलणे ही बाब देखील चुकीची राहणारी आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्यानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे पंधरा लाख नागरिक आजारी पडले आहेत. यात बहुतांश नागरिकांना कोरोनाची लागण झाली असावी, असा संशय देशाबाहेरील निरीक्षकांनी व्यक्त केला आहे. उत्तर कोरिया सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या माध्यमांकडून रुग्णांबाबत देण्यात येणाऱ्या माहितीवरून कोरोनाचा प्रसार अनेक पटीने झाला असावा, असा संशय आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, सुमारे अडीच कोटींच्या लोकसंख्येच्या देशात बहुतांश लोकांनी लस घेतलेली नसून औषधांचा देखील तुटवडा असून सध्या देशात मृतांची संख्या कमीच आहे. कोरिया विद्यापीठाचे प्रोफेसर नाम सुंग वुक यांनी म्हटले की, किम यांच्या अधिकाराला धक्का पोचू नये यासाठी मृतांचा आकडा कमी सांगितला जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्ताधीश असलेले किम जोंग उन हे प्रथमच कोरोनासारख्या मोठ्या महासाथीचा आणि संकटाचा सामना करत आहेत.

चीनकडून मदतीची तयारी

किम यांनी संयुक्त राष्ट्राच्या कोव्हॅक्स कार्यक्रमाला नकार दिला आहे. आता कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर दक्षिण कोरिया, चीनने लस देण्याची तयारी दर्शविली आहे. अमेरिकेने देखील आरोग्य मदत करण्याची तयारी केली आहे.

उद्रेकामागे प्याेंगयांगमधील मिल्ट्री परेड

उत्तर कोरियात कोरोनाचा प्रकोप होण्यामागे एप्रिल महिन्याच्या शेवटी राजधानी प्याँगयाँग येथील सैनिक संचलनाचा कार्यक्रम कारणीभूत असू शकतो.या संचलनात नवीन शस्त्र आणि प्रामाणिक सैनिकांचे सादरीकरण करण्यात आले होते. या संचलनात देशभरातील हजारो सैनिक सहभाग घेतला आणि नागरिकांची उपस्थिती होती. त्यानंतर किम यांनी सैनिकांसमवेत, अधिकाऱ्यांसमवेत फोटो घेतले आणि अनेक स्मारकांना भेटी देत सामूहिक छायाचित्रेही काढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com