Kim Jong Un Crying Video : ..अन् किम जोंग उनला अश्रू अनावर; देशातील महिलांना केली आणखी मुलं जन्माला घालण्याची विनंती

North Korea Birth Rate : संयुक्त राष्ट्रांच्या पॉप्युलेशन फंडने दिलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरियाचा 2023 मधील फर्टिलिटी रेट हा 1.8 टक्के होता.
Kim Jong Un Crying Video
Kim Jong Un Crying VideoeSakal

North Korea Kim Jong Un Crying : उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग उन यांची दहशत सर्वांना माहितीच आहे. मात्र, याच किम जोंग यांचा चक्क रडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. देशातील जन्मदर कमी झाल्यामुळे ते महिलांना आणखी मुलं जन्माला घालण्याची विनंती करत होते. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

रविवारी प्योंग्यांग शहरात 'नॅशनल मदर्स मीटिंग' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना किम जोंग म्हणाले, "राष्ट्राची ताकद वाढवणे ही महिलांचं देखील कर्तव्य आहे. खाली जात असणारा जन्मदर वर नेणे, आणि मुलांचे योग्य संगोपन करणे यासाठी देशातील महिलांसोबत मिळून आपण काम करणं गरजेचं आहे." यावेळी बोलताना ते भावनिक झाले, आणि रुमालाने त्यांनी आपले अश्रू पुसले.

संयुक्त राष्ट्रांच्या पॉप्युलेशन फंडने दिलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरियाचा 2023 मधील फर्टिलिटी रेट हा 1.8 टक्के होता. केवळ उत्तर कोरियाच नाही, तर दक्षिण कोरिया आणि जपानमधील जन्मदर देखील कमी झाल्याचं दिसून आलं आहे.

महिलांनाही अश्रू अनावर

या कार्यक्रमावेळी केवळ किम जोंग उनच नव्हे, तर उपस्थित महिलांनाही अश्रू अनावर झाले. समोरील कित्येक महिला आपले डोळे पुसत असल्याचं दिसून आलं. अर्थात, हा सगळा एक ठरवून केलेला 'ड्रामा' असल्याची टीका या कार्यक्रमावर होत आहे.

Kim Jong Un Crying Video
13 डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला करणार; खलिस्तानी दहशतवादी पन्नुची पुन्हा भारताला धमकी

सोशल मीडियावर किम जोंग यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. किम जोंग यांनी मिसाईल, रॉकेट बनवण्याऐवजी देशातील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं काही जण म्हणत आहेत. तर किमकडे आता तुरुंगात टाकण्यासाठी लोक कमी पडत आहेत का? असे चिमटेही नेटिझन्स काढत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com