
उत्तर कोरियात कोरोना वाढला; हुकुमशहा किम जोंग उन आक्रमक
उत्तर कोरिया प्रजासत्ताकाच्या स्थापनेपासूनच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत असल्याची भावना हुकुमशहा किम जोंग उन (North Korea dictator Kim Jong Un) यांनी व्यक्त केली आहे. देशातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या (Covid-19 outbreak in North Korea) पार्श्वभूमीवर किम यांनी हे विधान केलं आहे. देशात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
देशात १७ हजार ४०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख २० हजारांवर पोहोचली आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे २१ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त स्पुतनिक या वृत्तसंस्थेने दिलं आहे. उत्तर कोरियात शुक्रवारी कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला.
हेही वाचा: कोरोनामुळे कोरियात आणीबाणी; अध्यक्ष किम जोंग उन यांची घोषणा; पहिल्या रुग्णाची कबुली
गुरुवारी उत्तर कोरियाने गंभीर आणिबाणीची घोषणा केली. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant of Coronavirus)आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला, त्यासोबत किम जोंग उन यांनी कोरोनाचा नायनाट करण्याची शपथही घेतली. किम जोंग उन यांनी कोरोना प्रसाराच्या सर्व शक्यता लक्षात घेऊन त्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
किम जोंग उन यांनी देशाच्या हवाई, सागरी अशा सर्वच सीमांवर कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहे.
Web Title: North Korea Facing Biggest Challenge In History Says Kim Jong Un On Covid 19
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..