उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम सुरूच? 

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

अण्वस्त्रांसाठी वापरण्यात येणाऱ्या अणुइंधनाचे उत्पादन उत्तर कोरियाकडून वाढविण्यात आले असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांमधील सूत्रांनी केला आहे. गुप्तपणे अनेक ठिकाणी हे काम सुरू असून, अमेरिकेबरोबरील चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर ते दडविण्याचे प्रयत्न उत्तर कोरियाकडून सुरू आहेत, असे सांगण्यात आले.

वॉशिंग्टन - अण्वस्त्रांसाठी वापरण्यात येणाऱ्या अणुइंधनाचे उत्पादन उत्तर कोरियाकडून वाढविण्यात आले असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थांमधील सूत्रांनी केला आहे. गुप्तपणे अनेक ठिकाणी हे काम सुरू असून, अमेरिकेबरोबरील चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर ते दडविण्याचे प्रयत्न उत्तर कोरियाकडून सुरू आहेत, असे सांगण्यात आले.

अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गुप्तहेर संस्थांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरही उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. अनेक गुप्त ठिकाणी अणुइंधनाचे उत्पादन करण्यात येत आहे, अशी माहिती गुप्तचरांच्या ताजा अहवालातून समोर आली आहे. अमेरिकेला अंधारात ठेवून अणू कार्यक्रम रेटण्याचा उत्तर कोरियाचा प्रयत्न असल्याचेही गुप्तचरांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

दरम्यान, कुठल्याही सरकारी विभागाने या माहितीला अधिकृतपणे दुजारो दिलेला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Korea making more nuclear bomb fuel despite talks