किम जोंग उनची बहिण भावासारखीच.. दक्षिण कोरियाला दिली अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किम यो जोंग

किम जोंग उनची बहिण भावासारखीच.. दक्षिण कोरियाला दिली अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर नेहमी तणावाचे वातावरण असते. आता असाच संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. उत्तर कोरिया युद्धाला विरोध करत आहे मात्र जर दक्षिण कोरियाने लष्करी मार्ग निवडला तर उत्तर कोरिया सैन्यावर अणूबॉम्ब हल्ला करणार, अशी स्पष्ट चेतावणी मंगळवारी नेता किम जोंग उन यांच्या बहिणीने दिली.

हेही वाचा: रशियाकडून मानवतेला काळीमा; युक्रेनच्या जनतेवरील अत्याचारांनंतर जगभरातून टीका

किम यो जोंग म्हणाल्या, दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्याने उत्तर कोरियावरील हल्ल्यांवर चर्चा करताना जे वक्तव्य केले, ती खुप मोठी चूकआहे.

दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री सुह वूक शुक्रवारी म्हणाले होते की त्यांच्या देशाच्या सैन्याकडे उत्तम फायरिंग रेंज, सामर्थ्यवान असलेली विविध प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. उत्तर कोरियावर आणि त्वरीत हल्ला करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.

हेही वाचा: रशियाकडून मानवतेला काळीमा; युक्रेनच्या जनतेवरील अत्याचारांनंतर जगभरातून टीका

उत्तर कोरियाने या वर्षी वाढत्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांच्या श्रेणीची चाचणी केली आहे. 2017 नंतर प्रथमच अण्वस्त्रांची चाचणी पुन्हा सुरू करण्याची तयारी उत्तर कोरिया दाखवत असल्याचे बोलले जात आहे.

प्योंगयांग युद्धाला आपण विरोध करत असल्याच्याही त्या म्हणाल्या. सोबतच दक्षिण कोरियाला आपला प्रमुख शत्रू मानत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या दुहेरी भूमिकेमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Web Title: North Korea Threaten To Use Nuclear Weapons If South Korea Attacked

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top