उत्तर कोरियाची ‘यूएन’लाच धमकी

कार्यक्रमावर वारंवार टीका केल्यास योग्य ठरणार नाही ; कोरियाने बजावले
global
globalsakal

सोल : उत्तर कोरियाने अणु कार्यक्रम थांबवून शांतता प्रस्थापित करावी, यासाठी प्रयत्न करत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीलाच उत्तर कोरियाने आज धमकी दिली. आमच्या अणु कार्यक्रमावर वारंवार टीका केल्यास योग्य ठरणार नाही, असे कोरियाने बजावले आहे.

सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत फ्रान्सने उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर चिंता व्यक्त करत त्यांच्यावर पूर्णपणे बंदी घालण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली होती. त्यावर उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज प्रत्युत्तर दिले. ‘सुरक्षा समितीने आमच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर बंदी घालण्याचा विचार करण्यापेक्षा अशी बंदी घातल्यास त्याचे भविष्यात काय परिणाम होतील, याचा अधिक विचार करावा,’ असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com