किम जोंग उन यांचा जिनपिंग यांच्याशी संवाद; मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 मे 2020

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधला असून त्यांना निरोप पाठविला असल्याची बातमी स्थानिक न्यूज एजन्सीने दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या अफवांना आणखी एकदा पूर्णविराम मिळाल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

प्योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधला असून त्यांना निरोप पाठविला असल्याची बातमी स्थानिक न्यूज एजन्सीने दिली आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या अफवांना आणखी एकदा पूर्णविराम मिळाल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

किम जोंग उन तब्बल 20 दिवसांनी जनतेसमोर आले आणि आता या निरोपाच्या बातमीने किम यांनी कामकाजालाही सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. किम जोंग यांनी जिनपिंग यांना एक संदेश पाठवला आहे. यात त्यांनी जिनपिंग यांचे कोरोना व्हायरसविरूद्ध लढ्यात यश मिळविल्याबद्दल अभिनंदन केले. दरम्यान, हा मेसेज कोणत्या माध्यमाद्वारे पाठवण्यात आला, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही या स्थानिक न्यजू एजन्सीने दिलेली नाही.

प्रत्येक देशात वेगळी पद्धत; कोणत्या देशात कसे होतात कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार

किम जोंग उनने या संदेशाद्वारे चीनशी असलेले त्यांचे संबंध आणि आपल्या आरोग्याविषयीचे पुरावे दिले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, किम जोंग गेले २० दिवसांपासून गायब असल्याचे आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्यानंतर किम जोंग जगासमोर आले. मात्र ते किम जोंग नसून त्यांच्यासारखी दिसणारी ती व्यक्ती होती, असे समोर आले आहे. उत्तर कोरियाच्या माध्यमांनी १ मे रोजी किम जोंग खताच्या कारखान्याचं उद्घाटन करतानाचा व्हिडीओ प्रसारित केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Koreas Kim Jong Un sends warm greetings to Chinas Xi