आता प्रश्‍न बेरोजगारीचा

आता प्रश्‍न बेरोजगारीचा

आपले नशीब आजमविण्यासाठी जगभरातील लोक ज्या देशात जातात, त्या अमेरिकेत गेल्या आठवड्यात ६७ लाख लोकांना बेरोजगारी जाहीर करत सरकारकडून मदत मागितली आहे. या देशात आतापर्यंत एक कोटी लोकांचा रोजगार गेला आहे. 

ही परिस्थिती आणखी बिकट होण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. काहींच्या मते, अमेरिकेत बेरोजगारी तीन टक्क्यांनी वाढून एप्रिल महिना संपेपर्यंत देशात दोन कोटी लोक बेरोजगारी जाहीर करतील. ‘फिच’ या अर्थविश्‍लेषण करणाऱ्या संस्थेने केलेल्या अंदाजानुसार, उद्योग अडचणीत आल्याने आणि बेरोजगारी वाढल्याने अमेरिका आणि युरोपच्या अर्थव्यवस्था या तिमाहीत ३० टक्क्यांनी आकुंचन पावतील. या विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ४.१ लाख कोटी डॉलरचा फटका बसू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com