esakal | Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; मृतांचा आकडा...

बोलून बातमी शोधा

Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; मृतांचा आकडा...

स्पेनमध्ये साडेआठ हजार जणांचा मृत्यू

Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ; मृतांचा आकडा...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनाबधितांची संख्या साडेआठ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. तर आतापर्यंत 42 हजारांहून अधिक जणांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर लगाम लावण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनपासून सुरुवात झालेल्या या कोरोना व्हायरसचा फैलाव जगभरात मोठ्या प्रमाणात होत आहे. अमेरिका आणि यूरोपमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच असून, जगभरातही कोरोनाबधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. इटलीमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीत मृतांचा आकडा 12 हजार 400 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीत गेल्या 24 तासांत 837 जणांचा मृत्यू झाला आहे. 

img

स्पेनमध्ये साडेआठ हजार जणांचा मृत्यू

स्पेनमध्ये कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 748 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत साडेआठ हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 95 हजार 923 वर पोहोचला आहे.