इंडोनेशियात बळींची संख्या 1,200 वर

पीटीआय
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

इंडोनेशिया : इंडोनेशियाला शुक्रवारी बसलेला भूकंपाचा धक्का आणि त्यानंतर आलेल्या सुनामीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजार 234 वर पोचली असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. इंडोनेशियातील सुम्बा बेटला आज 5.9 रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकडून लूटमार केली जात असल्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. 

भूकंप आणि सुनामीच्या तडाख्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून 1,234 वर पोचली असल्याचे आज सांगण्यात आले. ग्रामीण भागात मदत पोचविण्यास सुरवात झाली असल्याचे प्रशासनाकडून आज सांगण्यात आले. सुमारे दोन लाख नागरिक सध्या इंडोनेशियात मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. यात हजारो लहान मुलांचा समावेश आहे. अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे सुनामीच्या संकटातून बचावलेल्यांचे हाल सुरू आहेत. 

सुनामीचा सर्वाधिक फटका बसलेल्या पालू शहराजवळ दरड कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत शेकडो लहान मुलांचा बळी केला असल्याचे आज समोर आले.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of Death in Indonesia is 1200