

Chinese espionage shadow around Nvidia CEO Jensen Huang
Sakal
न्यूयॉर्क : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चिप उत्पादनातील जगातील सर्वात बलाढ्य कंपनी 'एनव्हिडिया'चे (Nvidia) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जेनसेन हुआंग यांच्याभोवती सध्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वादाचे वादळ निर्माण झाले आहे. एका संशयित चिनी गुप्तहेर तरुणीशी असलेल्या कथित संबंधांवरून सुरू झालेल्या चौकशीमुळे अमेरिकन शेअर बाजारात एनव्हिडियाचे शेअर्स अक्षरशः पत्त्यासारखे कोसळले.