बायडेन यांच्यासाठी ओबामा मैदानात; येत्या २१ पासून प्रचार करणार

joe-biden-and-obama
joe-biden-and-obama

मॅकॉन - अध्यक्षपदाच्या निवडणुकीला  दोन आठवडे राहिलेले असताना माजी अध्यक्ष बराक ओबामा आता डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यासाठी प्रचारात उतरणार आहेत. बायडेन यांच्या प्रचार मोहिमेने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याचवेळी रिपब्लिकनचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ओबामा यांच्या प्रचाराने काही फरक पडणार नाही, असा दावा केलाे.

बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या दोन्ही कार्यकाळात ज्यो बायडेन (वय ७७) उपाध्यक्ष होते. ओबामा यांनी कमला हॅरिस आणि बायडेन यांच्यासाठी ऑनलाइन प्रचार केला आहे. परंतु ५९ वर्षाचे असणारे माजी अध्यक्ष प्रथमच प्रचारासाठी प्रत्यक्ष लोकांसमोर जात असल्याचे ही पहिलीच वेळ आहे.

ओबामा यांचे वक्तृत्व प्रभावी असल्याने त्यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिक गर्दी करतील, असा अंदाज डेमोक्रॅटिकच्या समर्थकांना आहे. याबाबत काल बायडेन म्हणाले की, २१ ऑक्टोबरपासून ओबामा हे प्रचारासाठी फिलाडेल्फिया आणि पेन्सिलव्हेनियाचा दौरा करणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बायडेन यांना भारत-अमेरिकी समुदायाचा पाठिंबा मिळत आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बराक ओबामा प्रभावशाली प्रचारक नाहीत. एका अर्थाने ते प्रचारात उतरणार ही बातमी माझ्यासाठी चांगली आहे. कारण त्यांनी चांगले काम न  केल्यानेच २०१६ मध्ये निवडून आलो.
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष

ट्रम्प प्रशासनाच्या अपयशाने अमेरिकेसमोर संकटाची मालिका
गेल्या चार वर्षात ट्रम्प प्रशासन सर्वंच आघाड्यांवर अपयशी ठरल्यामुळे हवामान बदलाबरोबरच नागरिकांचे आरोग्य, अर्थव्यवस्था, भूकबळी यासह अनेक संकटांचा सामना अमेरिकेला करावा लागत असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांनी केला. आता यात वर्णभेदाचाही मुद्दा सामील झाला असल्याचे त्या म्हणाल्या. 

विस्कॉन्सिन येथे देणगी जमा करण्यासाठी शुक्रवारी आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात बोलताना हॅरिस म्हणाल्या, की कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात येऊनही डोनाल्ड ट्रम्प यांनी काहीच हालचाली केल्या नाहीत. परिणामी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाचा प्रसार झाला. ट्रम्प यांना कोरोनाची भणक २८ जानेवारीलाच लागली होती. हा संसर्ग साधारण तापेच्या तुलनेत पाच पट अधिक घातक आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. एवढेच नाही तर हा संसर्ग हवेतूनही पसरू शकतो आणि मुलांना लागण होऊ शकते याची जाणीवही विद्यमान अध्यक्षांना होती. तरीही अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी आपल्या तोंडावर बोट ठेवले.  

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com