
Odisha Train Accident: पाकिस्तान ते रशिया, रेल्वे अपघातावर जगभरातील नेत्यांनी व्यक्त केल्या भावना; काय म्हणालेत वाचा
नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण ट्रेन अपघातावर जगभरातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये पाकिस्तानपासून रशियापर्यंतच्या राष्ट्र प्रमुखांचा समावेश आहे. सात देशातील प्रमुखांनी शोक व्यक्त केला असून आपण भारताच्या सोबत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. (Odisha Train Accident From Pakistan to Russia world leaders express their condolences)
संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष चाबा कोरोशी यांनी या रेल्वे अपघात मृत्यू पावलेल्या लोकांबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, भारतातील ओडिशात झालेल्या ट्रेन दुर्घटनेची बातमी ऐकून मला आतिव दुःख झालं. माझ्या सहवेदना आणि प्रार्थना पीडितांसोबत आहेत. (Odisha Train Accident)
ब्लादिमिर पुतीन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी या ट्रेन अपघातानंतर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांना आपला शोक संदेश दिला आहे. त्यांनी म्हटलं की, या भीषण अपघातात आपल्या लोकांना गमावलेल्या लोकांप्रती आमच्या सहवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना करतो. (Latest Marathi News)
शहबाज शरीफ : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देखील ओडिशात झालेल्या ट्रेन अपघातावर शोक व्यक्त केला आहे. भारतात ट्रेन अपघातात शेकडो लोकांचा जीव गेला, त्यासाठी मी दुःखी आहे. या अपघातात ज्यांनी आपलं कुटुंब आणि प्रिय व्यक्ती गमावल्या त्यांच्याप्रती माझ्या सहवेदना आहेत, जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
तुर्कीए : भारतातील ट्रेन अपघातावर तुर्कीए यांनी देखील दुःख व्यक्त असून जखमींना लवकर बरं होण्याची प्रार्थना केली आहे.
जस्टिन ट्रूडो : कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या अपघातांच्या फोटोंनी हृदय पिळवटून टाकलं आहे. मृत व्यक्तींबाबत माझी सहवेदना आहे. या कठीण काळात संपूर्ण कॅनडा भारतासोबत उभा आहे.
फुमियो किशिदा : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी देखील ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, ओडिशा ट्रेन अपघातात जीव गमावणाऱ्यांसोबत माझी सहवेदना आहे. संपूर्ण जपानच्यावतीनं या अपघातासाठी शोक व्यक्त करु इच्छितो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.
जेम्स क्लेवर्ली : युनायटेड किंगडम विदेश सचिव जेम्स क्लेवर्ली यांनी दुर्घटनेनंतर ट्विट करत माझ्या सहवेदना पीडितांसोबत आहेत.