
Odisha Train Accident: "सर्व खासदारांनी महिन्याचा पगार द्यावा"; भाजप खासदाराचं मदतीचं आवाहन
Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर इथं झालेल्या तीन ट्रेन्समधील भीषण अपघातात २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्विट केलं आहे.
यामध्ये त्यांनी सर्व खासदारांना अपघातग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. आपला एक महिन्याचा पगार त्यांनी यासाठी द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे. (Balasore Train Accident BJP MP Varun Gandhi expresses his grief urges MPs to donate a one month salary)
वरुण गांधी म्हणतात, ओडिशातील रेल्वे दुर्घटना विदारक आहे. ज्या कुटुंबियांना या दुर्घटनेमुळं उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांच्यासोबत पहाडासारखं उभं रहावं लागेल. माझं सर्व खासदारांना आवाहन आहे की आपण सर्वांनी आपल्या पगारातील एक हिस्सा या पीडित कुटुंबियांसाठी देत त्यांची मदत करण्यासाठी पुढे यायलं हवं. पहिल्यांदा त्यांना सहकार्य मिळायला हवं नंतर न्याय.