
Historical Video : तुम्ही कधी विचार केलाय १२५ वर्षांपूर्वी आपलं जग कसं असेल? घोड्यांच्या टापांचा खटखटाट, रस्त्यावर फिरणाऱ्या साध्या गाड्या आणि लोकांचं साधं पण उत्साही जीवन.. आता हा अनुभव प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आहे. X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोहित कुमार यांनी शेअर केलेला एक दुर्मिळ व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ १९०० च्या आसपासच्या काळातील आहे आणि तो त्या काळच्या जगाची एक झलक दाखवतो.